भारतातील दक्षिणेस असलेल्या अंदमार- निकोबार येथील ३ बेटाचे नाव बदलण्यात येणारआहे. यासंदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतला असून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव या बेटाला देण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्रानी दिलेल्या माहितीनुसार अंदमान निकोबारच्या तीन बेटांचे नामकरण करण्यात येणार असून हेवाॅक बेटाचे नाव ‘स्वराज बेट’; नील’बेटाचे नाव ‘शहीद बेट’ तर ‘राॅस’ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात येणार आहे.