जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिचित आहे. 9 जुलै 1949 रोजी राष्ट्रभक्ती च्या भावनेने सक्रिय झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद – अभाविप या संघटनेचे स्थापन झाले. जगातली सर्वात मोठी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद.
अभाविप द्वारे मुंबतील जवळपास 80 महाविद्यालयात राष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद करून त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून शुभेच्छा देण्याचे काम अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केले. देशातल्या मोठमोठ्या व्यक्तिमत्वांनी पण अभाविपच्या कार्यकर्त्यांना तसेच विद्यार्थ्यांना आज शुभेच्छा दिली.