तारक मेहता का उल्टा चश्मा मधील सोनू म्हणजेच अभिनेत्री निधी भानुशाली लवकरच बिग बॉस १५ मध्ये दिसणार आहे. निधी ने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत सोनू हे पात्र साकारले होते. दरम्यान तिने २०१९ मध्ये हा शो सोडला. आता सोनू हे पात्र अभिनेत्री पलक सिधवानी साकारत आहे. निधी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फार सक्रिय असते. ती नेहमी तिच्या चाहत्यांकरिता अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
बिग बॉस १५ साठी अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. यातील पहिला स्पर्धक अर्जुन बिजलानी हा आहे. बिग बॉस चा हा नवा सीजन ओटीटी वर रिलीज होणार असून हा शो सलमान खान सोबतच करण जोहर देखील होस्ट करणार आहे.
बिग बॉस १५ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वात काय नवे बदल दिसणार आहेत यासाठी सर्वच फार उत्सुक आहेत.