गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी 6 फेब्रुवारी वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. चित्रपटसृष्टी बरोबरच विविध क्षेत्रातील लोकांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली.प्रसिद्ध डेअर ब्रँड अमूल कंपनीच्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.या पोस्टमधून अमूल कंपनीनं लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान पोस्टमध्ये लता दीदींचे तीन फोटो दिसत आहेत. त्यापैकी एकामध्ये त्या गाणं गाताना दिसत आहेत तर दुसऱ्यामध्ये त्या वीणा वादन करताना दिसत आहेत. फ्रेममध्ये लता दीदींचा बालपणीचा फोटो दिसतोय. या पोस्टमध्ये लता दीदींच्या त्या गीताचे बोल ‘हम जहां जहां चलेंगे आपका साया साथ होगा’ असे लिहिलेले दिसत आहे.अमूल कंपनीनं ही पोस्ट शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ‘भारताच्या कोकिळेला भावपूर्ण श्रद्धांजली!’