झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम सध्या गाजत आहे. या कार्यक्रमात नुकत्याच पार पाडलेल्या एपिसोडमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीच्या पदार्थांबाबात अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.अमृता यांना एका बैठकीत देवेंद्रजी किती किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न शोचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारला. त्यावर अमृता यांनी ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असं म्हटलं आहे.
या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. तेव्हा पत्नी सुगरण आहे की आई असा प्रश्न फडणवीस यांना प्रशांत दामले यांनी विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘प्रशांतजी असे प्रश्न विचारु नयेत. आईला म्हटले की तुझ्यापेक्षा बायकोच्या हातचा पदार्थ जास्त आवडतो तर आईला राग येणार नाही. पण जर याच्या उलट केले तर जगणे मुश्किल होई शकते. त्यामुळे असे प्रश्न विचारु नका.’ असे म्हटले. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्यासोबतच अभिनेत्री स्मिता जयकर आणि गायक स्वप्नील बांदोडकर हे कलाकार सहभागी आहेत.