अमेरिकेच्या महिला संघाने चौथ्यांदा FIFA महिला फुटबॉल विश्वचषक जिंकला. फ्रान्समध्ये खेळल्या गेलेल्या ‘FIFA महिला फुटबॉल विश्वचषक 2019’ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमेरिकेनी नेदरलँडला पराभूत केले. चारवेळा ही स्पर्धा जिंकून अमेरिकेच्या महिला संघाने नवा विक्रम रचला आहे.
अमेरिकेच्या महिला संघाने सन 1991, सन 1999, सन 2011 व सन 2015 मध्ये अंतिम फेरी गाठली आणि त्यापैकी सन 2011 वगळता ते विश्वविजेते ठरले.
स्पर्धेच्या अन्य पुरस्कारांचे विजेते –
सर्वोत्कृष्ट खेळाडू – मेगन रॅपिनो (अमेरिका)गोल्डन बॉल आणि गोल्डन बूट – मेगन रॅपिनो (अमेरिका)गोल्डन ग्लोव्ह – सारी वान विनेंडल (नेदरलँड)सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – सारी वान विनेंडल (नेदरलँड)फेअर प्ले पुरस्कार – फ्रान्स
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA)
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. दि. 21 मे 1904 रोजी FIFAची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय झ्युरिक (स्वित्झर्लंड) येथे आहे. त्याच्या सदस्यत्वामध्ये सध्या 211 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.
हा एक खासगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रिडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो. FIFA फुटबॉल या क्रिडाप्रकाराच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या, विशेषत: पुरुष विश्वचषक (1930 सालापासून) आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून), आयोजनासाठी जबाबदार आहे. दर चार वर्षांनी फुटबॉल विश्वचषक खेळवले जाते.