जर का परीक्षा घेतली जाणार आहे तर विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षां केंद्रावर न बोलवता व्हाट्सएप व इमेलच्या माध्यमातून। असईनमेंट स्वरूपात परीक्षा घेतल्या गेल्या जाव्यात ही मागणी विद्यार्थी भारती कडून केली गेली आहेच तसेच प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्षाच्या ATKT, BACK LOG, Y.D च्या विद्यार्थ्यांना देखील याच काळात व असाईनमेंट स्वरूपात परीक्षा घेऊन त्यांना मुक्त करा अशी मागणी विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केली आहे.
दरम्यान, आता 2020-21 मधील द्वितीयव तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले असून जे विद्यार्थी एटीकेटी किंवा बॅकलॉग मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना प्रवेशास अडथळे नको व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय न करता त्यांचं वर्ष वाया जाऊ नये याचीही सोय परीक्षांच्या नियोजनात असणे गरजेचे आहे. तसेच अंतिम सत्रातीतील विद्यार्थ्यांप्रमाणेच असाईन्टमेंट सबमिट करण्यासाठी ग्रामीण पातळीवर कॉम्प्युटर व इंटरनेट च्या सोयी ग्राम पंचायत मध्ये पुरवण्यात याव्या त्यासाठी मुख्य केंद्रावर विद्यार्थ्यांना बोलावण्याची सक्ती करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणतेही प्रयोग करु नये. असे विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी सांगितले.