विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना आज भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये रंगणार भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजीचा मारा असा हा सामना रंगणार या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात असले तरी न्यूझीलंडला कमी लेखणे भारताला महागात पडू शकेल
नाणेफेकीचा कौल महत्वाचा?
• विश्वचषकात यंदा नाणेफेकीचा कौल अत्यंत निर्णायक ठरला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक विजय नोंदवण्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
• आत्तापर्यंत 42 सामने झाले असून त्यात 14 सामन्यांत लक्ष्य गाठताना संघ जिंकले, तर 27 सामन्यांत संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत.
• 2007 च्या विश्वचषकात प्रथम फलंदाजी आणि निर्धारीत लक्ष्य गाठणाऱ्या संघांची आकडेवारी ही सारखीच म्हणजे 25-25 अशी होती. 2011 मध्ये ती 24-23 अशी तर 2015 ती 24-24 अशी होती.
आज कुणाला संधी?
• लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांचे स्थान निश्चित आहे.
• आता उर्वरित चार स्थानांसाठी संघव्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. सातव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकचे स्थान कायम ठेवायचे की केदार जाधवला पुन्हा संघात स्थान घ्यायचे.
• रवींद्र जडेजाचे स्थान कायम ठेवून चहल, कुलदीप पैकी एकाची निवड करायची का?.
• 3 प्रमुख वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायचे की भुवी, शमी पैकी एकाला विश्रांती द्यायची? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पाऊस आला तर काय? :
▪ या लढतीवर पावसाचे सावट असून आज पावसामुळे खेळ झाला नाही तर उद्या बुधवारचा दिवस त्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
▪ मात्र बुधवारीही खेळ झाला नाही तर भारत व न्यूझीलंड यांनी साखळी गटात केलेल्या कामगिरीचा निकष लावला जाईल. त्यानुसार गुणांच्या आधारे भारतास अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.
आमने-सामने इतिहास
• वनडे 106 I भारत : 55 विजय I न्यूझीलंड : 45 विजय I टाय : 1 I अनिकाली : 5
• वर्ल्डकप 8 I न्यूझीलंड : 4 विजय I भारत : 3 विजय I अनिकाली : 1
स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर. I वेळ : दुपारी 3 पासून.