माफी असावी पण असं बोलतोय, लिहितोय. बेअक्कलसारखे जगतोय आपण गेल्या कित्येक पिढ्या त्यामुळे देश, येथील जनतेचे प्रश्न या सर्वांचा आपल्याला काही फरकच पडत नाही. एकीकडे महासत्ता होण्याची स्वप्ने आणि एकीकडे टाळ्या आणि थाळ्यांचा आवाज नेमकं कुठे जात आहोत आपण???
आपल्याला सेवा सुविधा देणाऱ्या सर्व कष्टकरी आणि श्रमिक वर्गाचा त्यांच्या त्यागाचा आदर आहेच आणि तो कायम राहीलही मात्र हेच का आपले समाजभान??? हिरोशिमा नागासाकी सारखी शहरे अण्वस्र युद्धात बेचिराख झाली आणि त्यानंतरच्या काळात जगाला थोडीफार अक्कल आली…
गेल्या काही वर्षांपासून निसर्गात होत असलेले बद्दल कुठे दुष्काळ, कुठे महापूर, कुठे मोठ्या प्रमाणात जंगलाला लागलेल्या आगी सातत्याने होणारे भुकंप ह्या निसर्गाच्या मानवाला दिलेल्या सुचना नाहीत तर काय आहे तरी आपण सुधारलो का तर उत्तर नाही…
मुंबई दरवर्षी पाण्यात तुंबते काही दिवस बंद राहते आपण मात्र मुंबई कधी थांबत नाही तिला काही फरक पडत नाही हे बोलुन मोकळे होतो पर्याय काय आणि किती शोधले आपण उत्तर काहीच नाही…
इतरत्र थुंकू नये, कचरा रस्त्यावर टाकु नये, उघडयावर शौचास बसू नये हे समजवायला लागतंय इतके हरामखोर झालोय आपण…
मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, पाण्याची नासाडी, वाहनांची गर्दी कोणाला कसली पडली नाही इतके शंड झालोय आपण…
गेल्या दोन चार दिवसांपासून तर आपण कहरच केला सोशल मीडियावर फक्त हैदोस अगदी त्या व्हायरसबद्दल शक्य ते सर्व फालतु जोक्स, व्हिडीओ, फोटो सर्वच तयार केले आपण…
माणसाला जगण्यासाठी काय पाहिजे स्वच्छ परिसर, चांगले आरोग्य आणि सुंदर पर्यावरण हे आपण देवु शकत नाही आणि चाललो कष्टकरी आणि श्रमिक वर्गाचे आभार मानायला किती दुटप्पीपणा हा???
वेळ अजूनही गेली नाही सर्वांनी मनाशी निर्धार केला तर नक्कीच आपण या गंभीर परिस्थितीचा मुकाबला करू शकु काय करावं हे सांगण्याची गरज नाही फक्त लक्षात ठेवा जमल्यास रक्तदान नक्की करा. आणि हो टाळ्या वाजवा अथवा थाळ्या तो निर्णय तुमचा मात्र माणसाला माणुस म्हणुन जगवा हेच खरे कष्टकरी आणि श्रमिक वर्गासाठी आपण मानलेले आभार असतील…
-अविनाश पाटील
(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत)