उत्तम आहार हाच योग्य आरोग्याचा कानमंत्र आहे. आरोग्य नेहमी ठणठणीत ठेवण्यासाठी आपण अनेक पदार्थांचे सेवन करतो. पण आपल्या घरातील च काही गोष्टी अशा आहेत ज्यांचे सेवन केल्यास आपण आपले आरोग्य सुधारू शकतो. असाच एक पदार्थ म्हणजे कांदा. आपल्या सगळ्यांच्या घरी वापरला जातो आणि त्याचे अनेक फायदे आहेत.
१ कांदा हा जंतूनाशक आहे. कापलेल्या कांद्याच्या वासाने शरीराचे हानी करणारे जंतू नाश पावतात.
२ हिरवा कांदा- कांद्याचे रोपटे असते. मुळाशी कांदा व वर त्याची हिरवी पाल असते. हिवाळ्यात यास लोक खाण्यास जास्त पसंत करतात. हा पूर्णपणे ओला कांदा म्हणून ओळखला जातो.
३ लाल कांदा- हा बाहेरुन लाल गुलाबी रंगाचा असतो. हा पांढर्या कांद्या पेक्षा कमी उग्र आणि थंड असतो. या कांद्याचा वापर कच्चा खाण्यात जास्त होतो.
४ पांढरा कांदा- हा कांद्याचा मुख्य प्रकार आहे. हा कांदा कच्चा, शिजवून तसेच भाजूनही खाल्ला जातो.
५ उन्हाळ्यात कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. त्यामुळे डॉक्टरही या दिवसांमध्ये भरपूर कांदा खाण्याचा सल्ला देतात.
६ उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डीहायड्रेशन होत नाही. तसेच उन्हामुळे होणारे इतर आजार होण्यापासून देखील रक्षण होते.
७ कांदा हा अनेक विकारांवर गुणकारी आहे. भरपूर प्रमाणात कांदा खाल्यास अनेक समस्यांचा त्रास कमी होतो.
८ कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम ,कार्बोहायड्रेट, खनिज, फॉस्फरस, कॅलरी, लोह असते. तसेच कांदा आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता देखील भरून काढतो.
९ सर्दी, कफ अथवा घशाच्या खवखवीवर कांदा हा रामबाण उपाय आहे.
१० डायबेटीस चा त्रास होत असेल तर आहारात कांद्याचे सलाद म्हणून सेवन केल्यास फायदा होतो.