तुम्ही बर्याच वेळा पाहिले असेल की, काही लोकांच्या शरीरात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम नसल्यामुळे अनेक आजार उद्भवत असतात. त्यात कॅल्शियमची समस्या अतिशय गंभीर आहे. जर आपल्या शरीरातही कॅल्शियमची कमतरता असेल तर आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी तुमच्या आहारात नेहमीचं खालील गोष्टींचा समावेश असणे खूपच गरजेचे आहे.
दुध व पनीर या व्यतिरिक्त कॅल्शियम सहसा हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात असते. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी बरेच घरगुती उपचार आहेत. ज्याच्या मदतीने आपण त्याच्या कमतरतेवर मात करू शकतो.
स्नायूंची पकड, दात मजबूत करण्यासाठी आणि शरीराच्या विकासासाठी शरीरात कॅल्शियमची अत्यंत आवश्यकता असते. याव्यतिरिक्त, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, सांधेदुखी आणि स्नायूचे विकार देखील होतात. पण आपण जर नियमितपणे हिरव्या पालेभाज्या घेतल्यास तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
भाज्यामध्ये फुलकोबी, पालक, आणि ब्रोकोली यामुळे देखील शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते. तसेच सोयाबीन खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होते. सोयाबीनमध्ये मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट, लोह, फायबर आणि प्रथिने असतात. जे हाडांसाठीही खूप फायदेशीर असते. आपल्याला शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढवायचे असेल तर सोयाबीनचे सेवन करण्यास सुरवात करा. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण त्यांच्या विविध प्रकारांवर अवलंबून असते.
याव्यतिरिक्त, सारडिन फिशमुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण देखील वाढू शकते. यामध्ये 33 टक्के कॅल्शियम असते. जर तुम्ही हलके-काटेरी मासे खाल्ले तर शरीरात कॅल्शियमचे प्रमाण खूप चांगले संतुलित राहते. या गोष्टी खाल्ल्याने तुम्ही तुमच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण विकसित करू शकता.