श्रावणोत्सव स्पेशल रेसिपी.
बर्याचदा उपवासाला काय काय बनवायचे हा नेहमीच प्रश्न पडतो. तर कधीकधी तेच तेच खायचापण कंटाळा येतो. म्हणून तुमच्यासाठी आगळी वेगळी व झटपट होणारी रेसिपी घेऊन आलो आहोत.
एक वाटी वरईचे तांदूळ
दोन किसलेले बटाटे (किस पाण्यात ठेवा)
जिरे, हिरवी मिर्ची, कोथिंबीर आणि तेल, मीठ इत्यादी.
कृती:
वरईचे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या व वाटीत काढून घ्या.
गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दिड वाटी पाणी हलक गरम करून त्यात बारीक चिरलेला मिरची, चवीप्रमाणे मीठ, थोडे जिरे टाकून घ्यावे.
त्यानंतर वरईचे पीठ व किसलेला बटाटा घालून ते मिश्रण एकजीव कराण्यासाठी पाच मिनिटे वाफवून घ्या.
काही मिनिटांतच त्याचा लगदा तयार होईल. ते मिश्रण एका भांड्यात काढून घेतले की थंड झाल्यावर, त्याच्या हाताने गोल आकारात चकत्या करून त्या तेलात तळून घ्या आणि दह्यासोबत लावून खा.
तर कशी वाटली श्रावण स्पेशल रेसिपी हे सांगायला विसरू नका. तसेच पोस्ट आवडल्यास तुमच्या फॅमिलीसर्कल मध्ये नक्की शेअर करा.