अनेक जणांना एँसिडिटीचा मोठा त्रास होतो. डोकं दुखणं, मानदुखी, छातीत जळजळ होणे, उलट्या होणे, अर्धशिशी, अस्वस्थ होणे अशा प्रकारचा त्रास होतो. झोप पूर्ण न होणं, जागरण, उपाशी राहाणं, चुकीची जीवनशैली, अवेळी खाणे, झोपेच्या सतत बदलत्या वेळा यामुळे त्रास होत असतो. एँसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी अनेक जण गोळ्या घेतात. परंतु अशा गोळ्यांमुळे काही वेळ बरं वाटतं परंतु पुन्हा त्याचा त्रास सुरु होतो. सतत गोळ्या घेतल्याने त्याचा शरीरावरही घातक परिणाम होत असतो. परंतु अॅसिडिटीवर घरगुती उपयांनीही काही वेळात आराम मिळू शकतो.
ऍसिडिटी वर घरगुती उपाय
१) गूळ : जेवणानंतर थोडासा गूळखाल्ल्याने ऍसिडिटीपासून लगेचच सुटकारा मिळतो.
२) पाणी : पहाटे उठल्यावर दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.
३) लवंग : जेवण झाल्यानंतर लवंग चोखल्याने ऍसिडिटीपासून लगेचच सुटकारा मिळतो.
४) तुळस : सकाळी उपाशी पोटी तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास नेहमीसाठी समाप्त होतो.
५) शोप : जेवल्यानंतर अर्धा चमचा शोप खाल्ल्याने ऍसिडिटीपासून मुक्ती मिळते.
६) मुळा : मुळ्यात लिंबू व काळ्यामीठाचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.
७) मनुका : मनुकांना दुधात उकळून घ्या आणि ते थंड झाल्यावर त्याचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास बर्याच प्रमाणात कमी होतो.