दहावी बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला , पण या निर्णयाला राज्यात विविध ठिकाणी विरोध होत असून विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलनं केली आहेत. मुंबईत धारावी परिसरात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
तर नागपुरा आणि औरंगाबादमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ऑफलाईन परीक्षा रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी नागपूरच्या तुकडोजी चौकात आंदोलन केलं. यावेळी आंदोलनाला हिंसळ वळण लागलं. विद्यार्थ्यांनी चौकात उभी असलेली एक बस फोडली.
दरम्यान हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे.