सौंदर्याच्या दृष्टीने केसांचे अत्यंत महत्व आहे. केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे यासारख्या केसांच्या समस्या असतात.
केसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटॅमिन, प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ठ बनतात, गळतात आणि निस्तेजही होतात.
केसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्री आणि पुरुष दोघेही ग्रासलेले आहेत. केसांची समस्या गंभीर असली तरीसुद्धा, आपण जर आपल्या जीवनशैलीमध्ये अगदी थोडासाच बदल केल्यास केसांच्या सर्व समस्यांचे सहजतेने निरसण होईल. यासाठी येथे काही सहज सोपे उपाय दिले आहेत.
1) केस धुताना :- केस नियमित म्हणजे आठवड्यातून दोनदा धुवायलाच हवेत. त्यासाठी माइल्ड शॅम्पूचा वापर करावा.
केस धुताना डोक्यावर केस घेऊन ते एकत्र धुवू नयेत.
2) केस धुतल्यानंतर :- केस नैसगिर्कपणे कोरडे होवू द्यावेत. केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर कमीतकमी करावा. केस कोरडे करण्यासाठी टॉवेलने घासून केस कोरडे करू नयेत.
3) केस विंचरताना :- ओले केस कधीही विंचरू नयेत. केस नियमित विंचरणे फायद्याचे असते. रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी कमीत कमी १०० वेळा केसांत कंगवा फिरवणे आवश्यक आहे.
4) कंडिशनर लावताना :- कंडिशनरमुळे केस मजबूत, चमकदार होतात. केस कोरडे असताना कंडिशनर लावावे आणि कोमट पाण्याने ते धुवावे. शॅम्पू केल्यानंतर प्रोटीनयुक्त कंडिशनर केसांना लावावेत.
5) केसांना सूट होईल असा शॅम्पू वापरा. केसात कोंडा असेल,तर आठवड्यातून एकदा ऍण्टी डँड्रफ शॅम्पू वापरा.