गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जगात कोरोना या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे. सर्वप्रथम चीन या देशापासून संपूर्ण जगात हा विषाणू पसरलेला आहे. आता तर यूरोपात या आजाराने अनेक लोकांचे जीव घेतले आहे. त्यात प्रामुख्याने इटली, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, या पाश्चिमात्य देशांना या आजाराचा मोठा फटका बसलेला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिका सारख्या देशाला सुद्धा या आजाराने ग्रासले आहे.एवढे सगळीकडे होत असताना मात्र भारतात कोरोना या विषाणूला रोखण्यात थोडेफार यश आलेले आहे. कारण जगात लोकसंख्या च्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात हा आजार इतर देशांच्या तुलनेत फारच कमी पसरलेला आहे. याचे कारण आपण लवकर उपाय योजना केल्याने झाला आहे.
भारतात अनेक धर्म, जाती, पंथ, भाषा आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे उत्सव, सण आहेत. ते सर्व बाजूला ठेवून एकतेचे प्रतीक भारत या देशाने जगाला दाखवून दिले आहे. यात महत्वाचे म्हणजे आपले सरकार. सर्वप्रथम महाराष्ट सरकारने lockdown चे पाऊल उचलले. त्यानंतर पंतप्रधान यांनी संपूर्ण देशात 21दिवसांचे lockdown केले. या सर्व घटनांमुळे भारतात या आजाराला रोखण्यात यश आले आहे. यात महत्वाची भूमिका सरकार, पोलीस प्रशासन, डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, सेवाभावी संस्था इ. निभावत आहे. यामुळे हा कोरोना आजाराला रोखण्यात थोडेफार यश आले आहे. भारताने जगाला एकतेचे प्रतीक दाखवून दिले आहे. काही अपवाद वगळता सर्व भारतीय या आजाराशी एकतेतून लढा देत आहे. आणि काही दिवसात भारत हा या आजारापासून मुक्त होईल.
– तुषार गरुड