कोरोना हा प्रकार एका महायुध्दापेक्षाही भयंकर प्रकार आहे.या एका विषाणूने साऱ्या जगास वेठीस धरलं आहे.पण या सगळ्या गोष्टींवर आपण बारकाईने विचार करण गरजेचं आहे.संपुर्ण जगभर एक भीतीदायक वातावरण तयार झालं आहे.कोरोना मुळे नेमक्या कोणत्या गोष्टींना सामोरी जावं लागेल हेही आपल्याला पाहावं लागेल. कोरोना व्हायरसमुळे जगभरात एकूण दीड कोटी लोकांना फटका बसेल . मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होतील . मंदी आणि आर्थिक अराजकाता वाढतील . अमेरिका , चीन , युरोपसारखे देश आता हतबल होताना दिसत आहेत. हे जर असाच चालू राहील तर भारताची सुद्धा आर्थिक परीस्थित डबकाईला येईल. सर्वात महत्वाचं म्हणजे निसर्गावर विज्ञानाने मात करणे अशक्य आहे. असं मानलं जात की एक अज्ञात शक्ती विश्वाचे नियंत्रण करीत आहे. ती शक्ती म्हणजे ट्रम्प , मोदी किंवा चीनचे सत्ताधीश नाहीत. चीनच्या एका मासळी बाजारातून पसरलेला हा विषाणू जगाला भारी पडला आहे आणि हे सर्व देश अणुबॉम्ब , क्षेपणास्त्रे यांच्या स्पर्धेत धन्यता मानीत आहेत . आता कोरोना हा विषाणू एवढा भयंकर आहे, की एका विषाणू मुळे देश व जग भिकारी बनताना दिसत आहे. देश , माणसे आणि आपापल्या धर्माचे सर्वोच्च देवही गरिबीच्या संक्रमणावस्थेतून जात आहेत . कोरोनामुळे शेअर बाजार साफ कोसळले . त्यात अंबानींपासून अदानीपर्यंत श्रीमंत थोडे गरीब झाले . तसे आमचे जगभरचे देवही गरीब झाले. भक्तांशिवाय नेते आणि देवांनाही श्रीमंती नाही. सिद्धिविनायकापासून तुळजापूरपर्यंत , मक्केपासून व्हॅटिकनपर्यंत देवांच्या दारी सन्नाटा आहे.ही झाली सगळी जागतिक स्तरावरची परिस्थिती.पण हे सगळं भयानक वाटत असेल तरी यावर आपल्या प्रत्येक नागरिकांची काही कर्तव्य आहेत आणि ती आपण नीट बजावली तर आपण कोरोनाशी दोन हात करू शकतो. कोरोना हा भयंकर रोग आज आपल्या दारात येऊन पोहोचला आहे. आपण स्वताच स्वतःची आपली काळजी घेतली पाहीजे. आपल्याकडची बहूसंख्य लोकसंख्य गावाकडे आहे. व त्या तुलनेत आरोग्यसुविधा अतिशय कमी आहेत. त्यामुळे या आजारापासून होणारी जिवीतहानी टाळायची असेल तर तो रोग आपल्यापर्यंत येऊच नये ही खबरदारी आपण घेतली पाहीजे. आपल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी लोकांनी किमान खालील गोष्टी तरी पाळाव्यात. सर्वात महत्वाचं म्हणजे जे लोक ज्या ठिकाणी आहेत त्यांनी त्याच ठिकाणी सुरक्षित राहावे.करण अनेक लोक शहरातून गावाकडे जात आहेत. यातील कोणाला कोरोना ची लागण झाली असेल तर आपण ग्रामीण भागात जिथे विषाणू नाही तिथे सुद्धा तो पसरवू शकतो.आणि एकदा का तो ग्रामीण भागात पसरला तर त्याला नियंत्रणाखाली आणण कठीण होईल.सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा विकसित झालेल्या नाहीत.त्यामुळे कोरोनाचे रुग्ण ओळखणं कठीण होईल.आणि याचा आपल्याला खूप मोठा फटका बसेल.
प्रत्येकाने दर दोन तासांनी साबणाने हात धुतले पाहीजेत.नेहमी रूमाल जवळ ठेवा. शिंकताना, खोकताना तोंडाजवळ रूमाल धरा. रूमाल नसेल तर स्वताच्या खांद्यावर शिंका. कुणाचाही हात हातात घेऊ नका, गळाभेट घेऊ नका. सर्वांनी आपापल्या घरातच थांबावे.कोणतेही कार्यक्रम, सण – उत्सव, वाढदिवस साजरे करू नका. गर्दी होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका.मुंबई, पुणे किंवा इतर बाहेरगावाहून आलेल्या लोकांना घरातच थांबवावे. त्यांना अजिबात गावात, मळ्यात किंवा इतर नातेवाईकांकडे फिरू देऊ नये. वयोवृद्धासाठीच्या पुढच्या माणसांची विशेष काळजी घ्यावी. सतत मास्क लावायची काहीही गरज नाही. आपण गर्दीच्या ठिकाणी असलं तरच ते लावा. आजाराबाबत सिरीयस व्हा. पैसा, काम काही दिवस बाजूला राहूद्या. जिवंत राहीलो तर कितीही काम करता येईल व पैसे कमावता येईल. घरात कुणी सर्दी, खोकला, घसादुखी, ताप, जुलाब यामुळे आजारी असेल तर अशा व्यक्तीला वेगळ्या रूममध्ये हलवा. त्याच्याशी संपर्क आल्यानंतर साबणाने हात धुवा. त्त्या व्यक्तीला लगेच डाॅक्टरकडे न्या. तसेच आजारी व्यक्तीची माहीती ग्रामपंचायतीला व सरकारी दवाखान्यात तातडीने कळवा. कृपया लपवून ठेऊ नका. हा रोग आता दिसतोय त्यापेक्षा खूप गंभीर आहे. पसरला तर आटोक्यात आणने अवघड होईल. त्यामुळे कृपया सुचना पाळा. आपली, आपल्या कुटुंबाची, शहराची गावाची काळजी घ्या. काळजी घेऊन आपला व आपल्या लोकांचा जीव वाचवा. नाहीतर परिस्थिती खूप गंभीर होईल….
– दिप्ती शेलार