देशाता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेगही वाढवा यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या देशातील दोन कोरोना प्रतिबंधक लसींना DCGIनं खुल्या बाजारात विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. या दोन्ही लसींच्या निर्मिती कंपन्या सीरम आणि भारत बायोटेकनं यासाठी परवानगी मागितली होती.
दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी 25 ऑक्टोबर रोजी DCGI कडे कोविशिल्डला खुल्या बाजारात विक्रीच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. तसेच भारत बायोटेकचे संचालक व्ही. कृष्णमोहन यांनी देखील कोवॅक्सिनला खुल्या बाजारात विक्रीसाठी मंजुरी मिळावी याासाठी प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह माहिती सादर केली होती.