भारतीय रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी २०२१ पासून चेकद्वारे पेमेंटमधील फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकारात्मक वेतन प्रणाली लागू केली होती.
मात्र आता १५ ऑगस्टपासून ते अनिवार्य करण्यात येणार त्यानुसार २ लाख किंवा त्याहून अधिकच्या चेकवर सकारात्मक वेतन प्रणाली म्हणजेच पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टम लागू होईल RBI ने दिलेल्या माहितीनुसार ही सुविधा ५०,००० किंवा त्याहून अधिकचे धनादेश देणाऱ्या सर्व खातेधारकांसाठी लागू केली जाईल तसेच चेकद्वारे २ लाख किंवा त्याहून अधिक रक्कम भरल्यावर ही सुविधा लागू केली जाईल
पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टम म्हणजे काय ? – पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हणजेच NPCI विकसित केली आहे. या प्रणालीअंतर्गत जास्त प्रमाणात व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या धनादेशांविषयी काही महत्त्वाची माहिती बँकेला द्यावी लागेल त्यानंतर या चेकचे पेमेंट क्लिअर केले जाईल असे RBI ने सांगितले