वाघांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रजातीला जपण्यासाठी जागतिक स्तरावर 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक व्याघ्र दिन निमित्त जाणून घ्या वाघांबद्दल इंटरेस्टिंग गोष्टी
वाघ हा पृथ्वी स्तरावर तिसरा मोठा मांसाहारी प्राणी आहे.
सायबेरियन टायगर हा सुमारे 660 पौंड वजनाचा समजला जातो.
जंगलात मोकळ्या फिरणार्या वाघांपेक्षा बंदी असलेले वाघ अधिक आहेत.
जगभरात प्राणीसंग्रहालय, सर्कस तर अमेरिकेमध्ये घरातही वाघ बंदिवान केले जातात.
वाघ हा सिंहाप्रमाणे कळपात राहत नाही. तो बराच काळ एकटं राहणं पसंत करतो.
वाघांमध्ये पुढच्या पायांच्या तुलनेत मागचे पाय अधिक लांब असतात. त्यामुळे त्यांना लांब झेप घेण्यास मदत होते.
एकावेळात 30 फूट लांबीचा टप्पा ते ओलांडू शकतात. तर त्यांच्या शेपटीचा झुपका देखील वैशिष्ट्यपूर्ण असतो.
कोणत्याही दोन वाघांच्या अंगावर सारखेच पट्टे नसतात, ते प्रत्येकामध्ये वेगवेगळे असतात.
जंगलात राहणार्या वाघाचं आयुष्यमान 10-15 वर्ष असतं. तर बंदी केलेले वाघ 20 वर्षांपर्यंत जगू शकतात.
वाघांच्या जीभेवरील लाळेत अॅन्टी सेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे जखमेला जीभ लावून ते जखम ठीक करू शकतात.
पाणवठ्याजवळ वाघ जास्त आढळतात. तर दिवसभरात 18 तास ते झोपू शकतात.
सायबेरियन टायगर आपण वाचवू शकलो नाही तर पुढील 10 वर्षात ते संपू शकतात.
विशेष : भारतामध्ये वाघांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे.