मकर संक्रांत असल्याने मुद्दाम तीळ खाण्याचे काय फायदे आहेत हे सांगणार आहे. तीळ तीन प्रकारचे असतात. पांढरे, काळे नि तांबडे. तिळात केलशियम, फास्फरस, मेगनिशियम, लोह, ताम्र, ओमेगा, बी काम्पलेक्स अजून खूप सारे व्हिटामिन उपलब्ध आहेत.
1) तीळ खाण्यामुळे त्वचा तजेलेदार नि चमकदार बनते.
2) तिळाची पेस्ट लावल्याने सुरकुत्या मिटतात. तिळाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.
3) दातांचे विकार नाहीसे होतात. दातातून रक्त निघण्याची पायोरिया बिमारी ठीक होते.
4) सांधे दुखीवर तिळाचा चांगला उपयोग होतो.ह्रदयाला बळ मिळते.
5)हार्ट अटेक वैगेरेवर नियंत्रण मिळवीता येतं. स्रियांना होणा-या प्रदर रोगात याचा चांगला उपयोग होतो.
6) श्वास दमा रोगावर तीळगुळ सेवन केल्याने निश्चित फायदा होतो. तीळाच्या सेवनाने बध्दकोष्ठता पण नाहीशी होते.
7) तांबळे तीळ नागकेशर आणि लोणी यांचं मिश्रण खाल्ल्याने मुळव्याधीत पडणारं रक्त बंद होतं.
8) तिळाच्या तेलात लसणाच्या कळ्या तळून ते तेल थंड झाल्यावर दोनतीन थेंब कानात टाकल्यास कानाचं दुखणं थांबतं. इतकच नव्हे तर बहिरेपणाही जातो.
9) तिळाच्या सेवनाने पित्त विकारात पण चांगला फायदा होतो. घाव सुजन यावर तिळ आणि हळद यांचा लेप लावल्यास आराम मिळतो.
तिळाप्रमाणेच तिळाचे तेलही खुप उपयोगी आहे. त्यामुळे स्वंयपाक घरात तिळाच्या तेलाचा नेहमी वापर केला पाहिजे. तीळ आणि इतर पदार्थ यांच्या संयोगाने ब-याच रोगांवर प्रभावी उपचार केला जातो.