सध्या काम, स्ट्रेस, टेन्शन, या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसून येतो. हल्ली धावपळीच्या युगामध्ये आपल्याला स्वतः साठी वेळच नाही देता येत. आपली चिडचिड होते, आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. यासर्वाचा परिणाम पॅनिक अटॅक मध्ये दिसून येतो.
पॅनिक अटॅकची काही लक्षणे –
१) एकटे राहावेसे वाटणे आणि स्पर्श टाळणे.
२) अत्यंत चिंताग्रस्तपणा जाणवणे
३) खूप भीती वाटणे.
४) छातीत वेदना किंवा श्वास घेण्यात अडचण.
५) जास्त घाम येणे किंवा चक्कर येणे.
६) अशक्तपणा
काही उपचार
१) मनात येत असलेल्या विचारांना एखाद्या कागदावर लिहीणे सुरू करा.
२) डोळे बंद करून श्वासावर नियंत्रण ठेवत मन चांगल्या गोष्टीत लावा.
३) थंड पाणी किंवा आवडीचं ड्रिंक घ्या.