प्रेक्षकांची मनावर अधिराज्य करणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेने ३२०० हैप्पीसोड्स पूर्ण करत नवीन टप्पा गाठला आहे. १३ वर्षांपूर्वी हा शो सुरू झाला होता आणि आता हा फॅमिली शो सर्वांचा आवडता झाला आहे. या शो मधील गोकुळधाम सोसायटी आज इतकी प्रसिद्ध झाली आहे कि ती ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखली जाते. तारक मेहता का उल्टा चष्मा या शो चे निर्माते आणि लेखक असित कुमार मोदी आहेत.
या मालिकेत बबीता हे पात्र अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारत होती. परंतु काही कारणांमुळे ती गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत दिसली नव्हती.तिने बनवलेल्या एका व्हिडिओ मुळे मुनमुन दत्ता वादात सापडली होती. परंतु नंतर तिने व्हिडिओ साठी सर्वांची माफी मागितली. दरम्यान मुनमुन दत्ता आणि निर्माता असित मोदी यांनी फोनवर बोलून आणि गोष्टी विसरून आणि पुढे जाण्याविषयी बोलून प्रकरण मिटवले. आता पुन्हा मुनमुन दत्ता हीच तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत कमबॅक झाले आहे. मुनमुन दत्ता आणि निर्मात्यांमधील मतभेद देखील संपले आहे.