दुसऱ्या लाटेत अनेक मुलांना कोरोना ची लागण झाली होती बहुतेक मुलांमध्ये सौम्य लक्षणं होती .खूप कमी मुलांमध्ये गंभीर लक्षणे दिसून आली होती. आगामी लाटेत ही असच काही घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना च्या तिसर्या लाटेत मुलांना जास्त संसर्ग होईल या कारणामुळे आज पालक खूप चिंतेत आहेत .कारण मुलांसाठी कोरोनाची लस अजून आलेली नाही.दुस-या लाटेत अनेक मुलांना कोरोनाची लागण झाली होती.खूप कमी मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षण दिसून आली होती. येणा-या तिस-या लाटेतही असच होईल अशी शक्यता वाटते. मुलांचे शारीरिक , मानसिक आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती कशी बळकट करावी; जेणे करून मुलाला संसर्ग होऊ नये
झालाच तरी तो लवकर बरा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
1) संतुलित आहार
संतुलित आहार मुलांचा आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत होतो मुलं कुपोषण आणि लठ्ठपणा बळी पडत नाहीत आजारी पडण्याची शक्यता कमी असते .आणि त्या संसर्गातून लवकर बरे होतात सर्व पोषक घटक कार्बोहायड्रेड फायबर प्रथिने चरबी जीवनसत्त्वं आणि खनिजं मुलांच्या दैनंदिन अन्नात समाविष्ट केले पाहिजे .यासाठी अनेक प्रकारचे अन्न दिले पाहिजे. मुलांच्या आहारात फळं, भाज्या, तृणधान्य ,प्रोटीन युक्त पदार्थ यांचा समावेश हवा. विविध रंगांच्या भाज्या आणि फळात अन्नात भरपूर प्रमाणात वापरले पाहिजे .यात सर्व प्रकारची जीवनसत्त्वं खनिजं , अॕन्टी – आॕक्सिडंटस असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.
२. पाणी
मुलांना दररोज आठ ते दहा ग्लास पाणी द्यावे .शरीराचं तापमान पाण्याला नियंत्रित होते, हे शहरातील सर्व पोषक घटकांच्या हालचालीचे स्रोत आहे. तसंच पाणी प्यायल्यामुळे मुलांना दिवसभर ताजेतवाने राहता येते. आणि खाल्लेल्या अन्नाच्या पचण्यास मदत होते.
३. व्यायाम आणि खेळ
मुलांचा शारीरिक मानसिक आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती व्यायाम तसेच खेळामुळे चांगली राहते .व्यायाम केल्याने हृदय फुप्फुसे स्नायू आणि हाडं मजबूत होतात . मुलं लठ्ठपणाला बळी पडत नाहीत .आणि व्यायामामुळे नकारात्मक विचारांचं चक्र मोडतं.
४. मुलांचे लसीकरण
पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना स्वाइन फ्लू, न्युमोनिय, टॉयफाईड ,डेंग्यू ,गोवर होण्याची शक्यता असते .हा संसर्ग करोना सह झाला तर तो घातक असल्याचा सिद्ध होईल हे सर्व रोग लस्सी द्वारे रोखता येतात म्हणून लहान मुलांना लस देणे अत्यंत आवश्यक आहे.
५. पुरेशी झोप
चांगली झोप रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवते .कमी झोपेमुळे शरीरातील नैसर्गिक किलर पेशी कमी होतात. संसर्गाची शक्यता जास्त असते मुलांनी एक वर्षापर्यंत 14 ते 16 तास एक ते तीन वर्षापर्यंत 11 ते 14 तास आणि लहान मुलांनी शाळेनंतर 10 ते 13 तास झोप घेतली पाहिजे.
६. मुलांच्या मानसिक आरोग्यास प्रोत्साहन द्यावे
चार पैकी एका मुलाची उदासीनता चिंता चिडचिडेपणा एकटेपणा विचारीत पण आणि कोरोनामुळे एकाग्रतेचा अभाव आढळतो .मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मुलांची सकारात्मक संभाषण करा त्यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकून घ्या. त्यांचे शब्द गांभीर्याने घ्या .त्यांच्याशी नकारात्मक बोलू नका . अभ्यासावर जास्त लक्ष देऊ नका. त्यांच्यावर दबाव टाकू नका. मुलांबरोबर व्यायाम आणि योग करणे ही पालकांची जबाबदारी आहे पालकांनी मुलांशी संवेदनशीलपणे वागले पाहिजे त्यांना जे काही सांगायचं आहे ते त्यांनी बोललेलं पालकांनी शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे.
७. मुलांनी काय खाऊ नये ?
सॉफ्ट ड्रिंक ,आईस्क्रीम ,केक, चायनीज, कुकीज ,पिझ्झा ,,बर्गर फास्टफूड, तळलेला चीज ,सॉस फ्लेवर्ड मिल्क आणि प्रोसेस फूड हे पदार्थ मुलांना देऊ नयेत. हे सर्व जळजळ वाढवणारे आहेत. त्यामुळे पित्त ही होते. आणि मुलांना त्रास होऊ शकतो.