देशात या कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही सुरूच आहे. गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची १८ हजार १३२ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर १९३ लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. देशात या कोरोना विषाणूच्या आजारामुळे आतापर्यंत ४ लाखाच्या वर लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना ॲक्टिव रूग्णांची आकडेवारी अजूनही वाढतच आहे. सध्याच्या परिस्थितीत भरतातील रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९७.९२% आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २१ हजार ५६३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत, त्यानंतर सक्रिय प्रकरणे २ लाख २७ हजार ३४७ वर आली आहेत. देशात आतापर्यंत तीन कोटी ३२ लाख ९३ हजार ४७८ लोकांनी कोरोनाला हरवले आहे. देशात आतापर्यंत चार लाख ५० हजार ७८२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.