देशात या कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही सुरूच आहे. गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची ३८ हजार ६२८ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी ६१७ लोकांचा मृत्यू झाला. देशात या कोरोना विषाणूच्या आजारामुळे आतापर्यंत ४ लाख २७ हजार ३७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना ॲक्टिव रूग्णांची आकडेवारी अजूनही वाढतच आहे. मागील २४ तासात उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रूग्णांची संख्या ४०,०१७ आहे.
मुंबईत गेल्या २४ तासात ३०९ कोरोना रुग्ण :
दरम्यान, गेल्या २४ तासात मुंबईत ३०९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या समोर आली आहे. तर ४०७ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत ७,१४,१६६ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुंबईतील रिकव्हरी रेट ९७% आहे. मुंबईत मागील २४ तासात
९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या मुंबईत ४३४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.