नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे उच्चस्तरीय आदेश ही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान,मृतांच्या नातेवाईकांना महापालिका प्रशासनाकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, सरकारकडून ५ लाखांची मदत मिळणार असून मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत मिळणार आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.