कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण देश बिथरून गेला आहे. प्रत्येकजण आपापल्या अनुभवानुसार वेगवेगळे सल्ले देत आहे. पण खरंच त्यातील काही सल्ले खूप उपयोगात येणारे आहे असे निष्कर्षास आले आहे.
त्यातीलच काही उपयोगी सल्ले खालीलप्रमाणे-
1) स्वतःला फिट ठेवण्यासाठी सकाळी उठून प्रथम गरम पाण्यात गुळ व लिंबाचा रस घ्यायला हवा. त्यामुळे दिवसभरात आपल्याला येणारा थकवा कमी होतो आणि त्याचबरोबर हे पाणी तुम्हाला वजन कमी करण्यासाठीदेखिल खूप मदत करते.
2) आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे सतत आपल्याला गार पाणी प्यायची इच्छा होईल आणि आपली पावले आपोआप फ्रीजकडे जातील परंतु यावेळी आपण फ्रीजऐवजी माठात वाळा टाकून पाणी प्यायले तर आपल्याला सर्दी खोकला होणार नाही व थंड पाणी प्यायला मिळेल त्याच बरोबर वाळा टाकल्यामुळे कुठलेही आजार होणार नाही व त्या पाण्याला एक सुगंध मिळेल आणि हे सहज उपलब्ध होणारे आहे.
3) घरीच असल्यामुळे आपल्याला भाजीपोळीचा कंटाळा येतो पण आपल्याला बाहेरचे अरबट चरबट खाण्याची भीती वाटते अश्या वेळी आपण त्याच भाज्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ, पराठे, दशम्या, रोल्स ,इत्यादी सारखे चमचमीत व हेल्दी पदार्थ बनवून खाऊ शकतो.