पाच राज्यांचे निवडणूक निकाल समोर आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल महाग झाले नाही तर स्वस्त झाले आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे एक रुपयाने कमी झाले आहेत. खरं तर, रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमती सतत वाढत होत्या.
दरम्यान, क्रूडच्या दरात वाढ होत असताना, निवडणुकीनंतर पेट्रोलच्या दरात 12 ते 16 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत होते. मात्र आता दर घसरल्याने लोक खूश आहेत. येत्या काळात किंमत आणखी खाली येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत क्रूड प्रति बॅरल १३९ डॉलरवरून १०८.७ डॉलरवर घसरले आहे.शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये पेट्रोलचे दर १०२.२७ रुपयांवरून १०१.८१ रुपये प्रति लिटरवर आले आहेत. जयपूरमध्ये हा दर 108.07 रुपयांवरून 107.06 रुपये प्रति लिटरवर आला आहे. त्याचवेळी डिझेल 91 पैशांनी घसरून 90.70 रुपयांवर आले आहे. पटनामध्ये शुक्रवारी सकाळी १०६.४४ ते १०५.९० रुपयांपर्यंत दर दिसला. मात्र, गुडगावमध्ये पेट्रोलच्या दरात किंचित वाढ होऊन तो ९५.५९ रुपयांवर पोहोचला आहे. तर नोएडामध्ये हा दर 95.73 रुपये प्रति लिटर झाला आहे. मेट्रो शहरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू येथे दर अनुक्रमे 95.41, 104.67, 109.98, 91.43 आणि 101.40 रुपये प्रति लिटर आहेत.