बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांचा ‘सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात नीना गुप्ता यांनी जबरदस्त अभिनय केला आहे. नीना गुप्ता नेहमीच त्यांची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडतात नीना गुप्ता अनेकदा आपल्या आयुष्याविषयी बऱ्याचदा मुलाखतीत सांगत असतात. पण आता त्यांचा जीवनावर आधारित एक पुस्तक येत आहे. नीना गुप्ता यांच्या या ऑटोबायोग्राफीचं नाव आहे ‘सच कहूं तो’.नीना गुप्ता यांनी सोशल मीडिया अकाउंट्सवरून ऑटोबायोग्राफीचं टायटलं जाहीर केल आहे. नीना गुप्ता यांनी या ऑटोबायोग्रफी बद्दल आनंद व्यक्त केला आहे.
नीना यांनी आपल्या पोस्टमध्ये ऑटोबायोग्राफीच मुखपृष्ठ शेअर केल आहे. कव्हर पेजवर नीना गुप्ता यांचा एक हसरा फोटो आहे, ज्यावर असं लिहिलं आहे की, ‘सच कहूं तो’. त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या आनंदित होवून पुस्तकाची पहली सँपल कॉपी दाखवत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. हे पुस्तक 14 जून 2021 रोजी रिलीज होईल. या पुस्तकात, त्यांच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापासून ते त्यांनी मिळवलेलं यश अनेक बाबी जाणून घेता येतील. तसंच नीना गुप्ता यांच्या वैयक्तिक जीवनाचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे.