मुंबई – गुंतवणुकीसीठी सद्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आपल्या देशात गुंतवणुकीसाठी एक विश्वासार्ह पर्याय म्हणून पोस्टाच्या योजनेकडे पाहिले जाते. भविष्याचा विचार करुन गुंतवणुक करत असाल तर पोस्टाची एमआयएस योजना तुमच्यासाठी आहे.
दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून गुंतवणुक केल्यास तुम्हाला दरमहा व्याजाचा लाभ घेऊ शकता. हे खाते एकट्याने किंवा तीन जन सयुंक्त उघडु शकता. या योजनेची कमाल मर्यादा ४.५ लाख रुपयांची आहे. ४.५ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला दर महिन्यात २४७५ रुपयाचा लाभ होऊ शकतो.