भारतीय संस्कृती आणि हिंदू प्रथेप्रमाणे प्रत्येकाच्या घरात तुळस असते. भारतात तुळशीची पूजा केली जाते. तुळस जिथे असते तिथे नेहमी सुख-समृद्धी नांदते असे शास्त्रात नमूद आहे. दररोज दहीसोबत साखर आणि तुळशीच्या पानांचे सेवन करणं शुभ मानले जाते.
दरम्यान, पौराणिक ग्रंथानूसार तुळशीच्या पानांच्या सेवनाने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन एकाग्र राहण्यासाठी मदत होते. मानसिक ताण- तनावासाठी तर तुळशीचं पानं अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे भारतात तुळस मोठ्या प्रमाणात घरोघरी दिसते.
तुळशीच्या पानापासून होणारे फायदे खालीलप्रमाणे
– तुळशीचे रोज दोन पानं खाल्ल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.
– शारीरिक आणि मानसिक थकवा नष्ट करण्यासाठी तुळस उपयुक्त आहे.
– दररोज तुळशीला पाणी घालून पूजा केल्यास आत्मिक समाधान मिळते.
– तुळशीचे पानं पाण्यात टाकून आंघोळ केल्यास त्वचा तेजोमय होते.
– घरात तुळस असल्यामुळे शांती आणि सकारात्मक ऊर्जा लाभते.