पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात काल गुरुवारी बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेस ट्रेनवचे १२ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. या दुर्घनेमध्ये सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, या विषयी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की त्या वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बचाव कार्याबद्दल सांगितले गेले असल्याने ही त्या म्हणाल्या. या दुर्घटनेमध्ये मृत्यू व्यक्तीच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये, गंभीर जखमींना १ लाख रुपये आणि सामान्य जखमींना २५,००० रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आहे.