मुंबई- छोट्या पडद्यावरी लोकप्रिय शो ‘बिग बॉस १५’च्या सेटवर आग लागल्याची बातमी सोमोर योत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ही आग रविवारी म्हणजे काल दुपारी १ च्या सुमारास लागली आहे. ही पहिल्या लेवलची आग असल्याचं सांगितलं जात असून अग्निशमन दलाच्या ४ गाड्या अपघातास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान गेली अनेक वर्ष बिग बॉस या वादग्रस्त शोचं सुत्रसंचालन करत आहे. याचा सेट मुंबईत आहे. आगीमुळे आतार्पंयत कोणतीही जीवित तहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.