उपोषणाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आली , तसेच विद्यार्थी भारती संघटनेची राज्यकार्यवाहक आरती किरण गजराज गुप्ता यांनी आजच्या उपोषणास सुरुवात केली . त्यानंतर किरण पाटील यांनी भेदभाव मोहीम ह्याबद्दल वाटणाऱ्या भावना आणि अनुभव याबद्दल मनोगत व्यक्त केले .तसेच संपूर्ण मोहीम आणि त्याचे मूळ उद्देश , हेतू आणि आतापर्यंत आपण पोहचवलेली वेगवेगळ्या विभागातली ही मोहीम आणि केलेली माणुसकीची जनजागृती तसेच महिलांवरील सुरू असलेले 21 व्या शतकातील अन्याय अत्याचार किंवा शैक्षणिक मागासलेपणा ह्यावर संवेदनशील भावना आणि विचार आरती ताईंनी व्यक्त केले उपोषणाचे पाहिले पर्व संघटनेच्या गीतांनी समाप्त झाले अशी माहिती कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली.
दरम्यान, उपोषणाचे दुसरे पर्व हे मानवतेची रॅली काढून आणि एकतेची घोषणा देत तसेच मराठी भारती अध्यक्ष पूजा बडेकर यांच्या योग्य मार्गदर्शन आणि मराठी भारती संघटनेने पाठींबा पत्र विद्यार्थी भारती संघटनेच्या राज्याध्यक्ष पूजा गणाई यांच्या हाती सोपवून पूजा बडेकर ,विजेता भोनकर,अनिल हाटे, राकेश सुतार,सचिन सुतार यांच्या समवेत विद्यार्थी भारती संघटनेला पाठिंबा दिला आणि पूजा ताईंच्या हस्ते पाणी पाजून उपोषणाची सांगता झाली अशी माहिती राज्यसचिव हृतिक ताम्हणकर यांनी दिली.