महाराष्ट्रात अनेक व्याघ्र प्रकल्प उभारलेले आहेत. व्याघ्र संवर्धन प्रकल्पामध्ये सर्वात मोठे नाव विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे आहे. कोणालाही वाघ निश्चितपणे बघायचा असेल तर तो हमखास ताडोबाला बघायला मिळणार व निसर्गप्रेमींना माहिती आहे. सुमारे १५६६ चौकिमी भागात पसरलेल्या या विभागातील वनक्षेत्रात २००६ मध्ये ९ वाघ नांदत होते आता ती संख्या ४० चाही वर पोहोचलेली आहे.
महाराष्ट्रातील काही व्याघ्र प्रकल्प
ताडोबा व्याघ्र प्रकल्प
ताडोबा-अंधारी संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी असलेली उत्कृष्ट अधिवास खाद्य पाण्याची उपलब्धता आणि तेथील वाघ यांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. या व्याघ्र प्रकल्पातील एकूण ६,२५.४० चौकिमी या संरक्षित क्षेत्रात गाभा क्षेत्राचा दर्जा असून भवतालचे ११०१ क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प
तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मदमत असलेल्या नागझिरा अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, आणि कोका वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र मिळून तयार झालेले आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
२०१० मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य आला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे आणि वन कोयना वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे भागाबरोबरच गव्हा,चितळ,सांबर, हरीण, बिबटे असे प्राणीही पहायला मिळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात महत्वपूर्ण पाणलोटक्षेत्र आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प
गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट वन्यजीव अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य,वान वन्यजीव अभयारण्य आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य हे सर्व क्षेत्र मिळून मेळघाट व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतर समाजाचेही लोक राहतात.
बोर व्याघ्र प्रकल्प
बोर अभयारण्याला ऑगस्ट २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला भारतातील एक प्राचीन आणि सर्वात लहान असा हा व्याघ्र प्रकल्प आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधतेने संपन्न आणि वन्य प्राण्यांचा उत्तम अधिवास असलेले हे ठिकाण त्यामुळेच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
पेच व्याघ्र प्रकल्प
पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प १९७५ साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले. फेब्रुवारी१९९९ मध्ये या व्याघ्र प्रकल्पाला अधिकृत दर्जा मिळाला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरचा हा व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने संपन्न असा आहे.