कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा आर्थिक फटका महावितरण वीज कंपनीला बसला. ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी ऊर्जा विभागाला कर्ज काढावे लागणार आहे. त्यानुसार विविध वित्तीय संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जाला राज्य शासनाने हमी दिली आहे.
दरम्यान, राज्यात टाळेबंदीच्या काळात उद्योग, व्यवसाय बंद झाल्याने वीजेची मागणी घटली. दररोज २३ हजार मेगा वॅटची असणारी मागणी १६ हजार मेगा वॉटपर्यंत खाली आली. त्याचबरोबर उद्योग व वाणिज्यिक ग्राहकांना व शासनाने इतरांना दिलेल्या सवलतीमुळे महानिर्मिती, महापारेषण व महावितरण वीज कंपनीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता ही आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी ऊर्जा विभागास वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे भाग पडत आहे.