टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू नाही पदकाची कमाई केली तिने 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले भारतीय इतिहासातील ऑलिंपिकमधील हे दुसरा पदक आहे याच पार्श्वभूमीवर मीराबाई च्या जीवनावर आधारित चित्रपट येणार अशी चर्चा सुरू झाली आहे या चित्रपटाची निर्मिती लवकरच केली जाणार आहे हा एक मणिपुरी चित्रपट असणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मीराबाई यांच्या जीवनातील संघर्ष पहायला मिळणार आहे मीराबाई यांनी चित्रपटासाठी होकार दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत हा चित्रपट इंग्रजी आणि इतर काही भारतीय भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे तसाच मीराबाई चानू यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रीचा शोधही सुरू आहे.ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.
दरम्यान, ऑलिंपिक मधल्या यशासाठी मीराबाईने तब्बल चार वर्षे खडतर परिश्रम केले त्याचे फळ तिला मिळाले ऑलिंपिक नंतर मिराबाई तब्बल दोन वर्षांनी तिच्या आई-वडिलांना भेटत होती या काळात तिचे आई-वडील पाठीशी भक्कम उभे राहिले होते बऱ्याच वर्षांनी मीराबाई घरी परतल्यानंतर तिने आईच्या हातच्या जेवणाचा आनंद घेतला याचा फोटोग्राफ तिने सोशल मीडिया वर पोस्ट केला त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप काही सांगून जात होते.
मणिपूर सरकारने मीराबाईची अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करून तिचा सन्मान केला तसेच तिला एक कोटी रुपये देऊन तिला गौरवले अजूनही तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू आहे मीराबाईच्या पदकामुळे सर्वांनांच आनंद झाला आहे. . त्यामुळे देश देशवासीय खुश आहेत .
मीराबाईचा साधंसुधं घर आहे तिचे आई-वडील जमिनीवरच जेवायला बसले होते .तिचा हा फोटो माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे .ऑलिम्पिक पदक विजेती चा हा साधेपणा देशातील मंडळींना भावना त्यांनी तिचा भरभरुन कौतुक केलं .गरिबी, आर्थिक परिस्थिती कधी तिच्या खेळातील करिअरच्या येऊ दिली नाही अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली शिवाय ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले .तरी तिचे पाय जमिनीवर आहेत अशी मोठी मार्मिक प्रतिक्रिया एका नेटकरांनी नोंदवली आहे.