देशभरात हिजाबवरुन राजकारण तापले असताना आता मुंबईतील एका कॉलेजमध्ये बुरखा बंदी करण्यात आली आहे. माटुंगा येथील एम.पी. शहा या कॉलेजने बुरखा बंदीचा निर्णय घेतल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. ऐकीकडे देशात हिजाबवरुन वातावरण बिघडले असताना मुंबईतील कॉलेजमध्ये बुरखा बंदी केल्याने राज्यातील राजकारण देखील तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कर्नाटकामधील हिजाबबंदी वरुन देशभरात निदर्शने होत आहेत. राज्यात देखील मालेगाव, औरंगाबाद, पुणे, मुंबई, बीड अशा अनेक शहरात कर्नाटकमधील हिजाबबंदीचा निषेध केला जात आहे. राष्ट्रपतींनी कर्नाटक सरकारला नीट शिकवण द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.ऐकीकडे देशात हिजाबवरुन वातावरण बिघडले असताना मुंबईतील कॉलेजमध्ये बुरखा बंदी केल्याने राज्यातील राजकारण देखील तापण्याची शक्यता आहे.