गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्वच गोष्टी आनंदात साजरा केल्या जात असतात. अनेक पर्यावरण प्रेमी गणेशोत्सव कालावधीत आपापल्यापरीने कार्यरत असलेले बहुतांशी दिसून येतात गणपतीच्या मूर्ती पासून त्यांच्या अंगावरील निर्माल्य पर्यंत अनेक पर्यावरण प्रेमींचे बारीक लक्ष असते. सद्यस्थितीत गणेश उत्सवात तील बदल निसर्गप्रेमी,पर्यावरण प्रेमी यांना भावलेले दिसून येत आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवातील बद्दल:-
1) यंदा गणेश भक्तांकडून इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली
2) श्रींच्या मूर्तीवर नॅचरल कलर्स देण्यावर भर देण्यात आला.
3) आगमन व विसर्जन सोहळे अगदीच साध्या पद्धतीने करण्यात आले.
4)परिणामी डॉल्बी,डीजे अशा कर्कश आवाजापासून अबालवृद्धांच्या कानाचे रक्षण यावर्षी झाल्याचे दिसून आले.
5) श्रींच्या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करण्याकडे यावर्षी लोकांचा कल असल्याचा दिसून आला.
6)चौपाट्यांवर भग्नमूर्तीत घट झाल्याची दिसून आली.
7)गतवर्षीपेक्षा यंदा निर्माल्याच्या
कचऱ्यातहि घट झाली