रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. एएफपीने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
युक्रेनची राजधानी किव्ह येथे न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार ब्रेंडट रेनॉड ५१ यांना गोळ्या लागल्या होत्या. रशियन सैन्याने इरपिनजवळ एका कारवर गोळीबार केला होता तेव्हा ही घटना घडली. त्यांच्यासोबत असलेला आणखी एक पत्रकार जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी पोलंड सीमेजवळ रशियन हवाई हल्ल्यात ३५ जण ठार झाले, तर ५७ हून अधिक जखमी झाले आहेत.