राज्यात आज १९ जून पासून – ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणास सुरुवात होत आहे. याशिवाय, ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत माहिती केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे.
त्यानुसार, शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून, ही मोहीम राबविण्यात येणार असून आजपासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे. त्याचबरोबर लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन सुद्धा करता येणार आहे.