कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जुन महिन्याचे धान्य देण्याचा आपण दि. १९ मार्चला निर्णय घेतला होता. दरम्यान केंद्रशासनाकडून दि.३० मार्च २०२० रोजी एप्रिल ते जुन २०२० दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती 5 किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाली आहे.
दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी ही वाटप होणार असून चिंतेच कुठलेही कारण नाही. यामध्ये केंद्र शासनाने मोठा पुढाकार घेतला असून सलग तीन महिने धान्य वाटप करण्यात येईल असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले