‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलीया भट्ट प्रमुख भुमिका साकारणार आहेत. तर हा चित्रपट करण जोहर दिग्दर्शित करणार आहे. करणने २०१६ मध्ये ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाविषयी करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करत, “अखेर…तो दिवस आला आणि माझ्या मनात खूप भावना आहेत, मात्र सर्वात वरती आहे ती म्हणजे कृतज्ञता! आम्ही चित्रपटाचे पहिले वेळापत्रक सुरू केले असून आता फक्त तुमचा आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे. ” असे कॅप्शन दिले आहे.
तर रणवीरने ही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करत “तुमच्या आशीर्वाद आणि प्रेम आमच्यासोबत असू देत, कारण ‘रॉकी और रानी’ची आगळीवेगळी गोष्ट सुरू झाली आहे. ” असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटात अभिनेता धरमेंदर, अभिनेत्री जया बच्चन आणि शबाना आजमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.