कोरोना एक महामारी जगाला बेहाल करणारी, हताश करणारी, प्रत्येकाला भीतीने घरात बसवणारी अशा या वैश्विक महामारीत आपण सर्व जन समुदाय घरात बसून आहोत; गेल्या 13 दिवसापासून आणि अजुन किती दिवस असेच घरात बसणार आहोत हे येणारी वेळच ठरवणार आहे. मात्र आपल्या सारखेच आपल्या सेवेत रुजू झालेले डॉक्टर ,नर्स ,सफाई कामगार ,पोलीस हे जर घाबरून घरात बसले तर काय होईल ?कल्पना करणे सुद्धा शक्य नाही. कोरोना चीनमधून प्रसारित झालेला रोग; कोणालाही कुठेही कोणत्याही वेळेत एका बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या सुदृढ व्यक्तीला होऊ शकतो. हा स्पर्श द्वारे होणारा आजार आहे. असे प्रसारमाध्यमांतून वेळ होईल सांगितले जात आहे. पूर्ण देशातून सुरुवात झाल्यापासून 14 ते 15 दिवसात झपाट्याने प्रसारित होत आहे. असे बातम्यांमध्ये दिसत आहे. एका व्यक्तीकडून अनेकांना बाधित होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक व्यक्ती भयभीत झालेला आहे. आणि म्हणूनच प्रशासनाने लॉक डाऊन म्हणजेच घरातून कोणीही बाहेर निघायचे नाही घरात राहणे सोयीचे व आपल्या आरोग्यासाठी हिताचे आहे असे जाहीर करण्यात येत आहे.
मग सर्वच घरात राहणे व देशातील सर्व प्रजेला घरात डांबून ठेवणे हे देशातील प्रशासनाला पोलीस यंत्रणे शिवाय शक्यच नाही. पोलिस व अधिकारी आज घ्या कोरोना युद्धात आपल्या सर्वांसाठी आपल्या घराबाहेर एका योद्ध्यासारखे लढत आहेत .तेव्हा आपण घरात सुरक्षित आहोत नाहीतर; आज या लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर येऊन लोक आपल्या भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येणार आणि कोरोना चा प्रसार होणार, अशा परिस्थितीत पोलीस स्वतःवर कोरोनाच संकट ओढवून सुद्धा आपल्या सेवेत दिवस-रात्र काम करत आहे. ते फक्त आणि फक्त आपल्या सर्वांसाठीच!
पोलिसांसोबत डॉक्टर्स आणि नर्स सुद्धा आपल्या जीवाची व परिवाराची परवा न करता कोरोना बाधित लोकांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना औषध उपचार करण्यासाठी तयार आहेत. हे सर्व जण आपल्या पुढे राहून कोरोनाशी सामना करत आहे. गल्ली ते दिल्ली पर्यंत आपलं जाळं कोरूना ने पसरवले आहे. यात नवजात शिशु ते वृद्ध सर्वांचाच समावेश आहे. पूर्ण देशात आज पर्यंत हजारो लोक बाधित झाले आहे. व आकडे वाढते आहेत; आणि मृत्यूचे तांडव जगभरात चालू आहे. ते आपले रक्षण करते पोलीस, डॉक्टर, नर्स आणि सफाई कामगार आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता आपल्यासाठी लढत आहेत. आपल्या कडून आपल्या रक्षण करत्यांना कुठलीही आडकाठी येता कामानये.आज आपल्या देशातील देवळातील देव सुद्धा लॉकडाऊन आहेत अशा या महामारीत आपले खरे रक्षण करते कोण आहेत; हे आपण ओळखले पाहिजे. पोलीस गरीबाची भूक मिटवण्यासाठी लढत आहे डॉक्टर्स व नर्स आपल्या जीव वाचवण्यासाठी लढत आहे आणि आपल्यासाठी घरापासून ते शहरापर्यंत स्वच्छता राखण्याचे काम सफाई कामगार करत आहे.रोगराई दूर ठेवण्यासाठी साठी ते कार्यरत आहेत. हे सर्व आव्हाने आपले रक्षण करते स्वीकारत आहे. आणि यावरून वाटते की हेच आपले खरे दैवत! आजच्या परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्याकडून शक्यतो परीने या दैवतांसाठी नुसत्या टाळ्या वाजून आभार मानणे तोडके होणार.
हे कोरोनाचे संकट कधी टळेल ते सांगता येत नाही. मात्र या तून जेव्हाही! आपली सुटका होईल तेव्हा आपण या सर्व परिस्थितीतून काहीतरी शिकायला हव आणि आपण ठरवायला हव की आपले दैवत कोण? आपण प्रयत्न केला पाहिजे की आपल्या रांगा शाळेसमोर लागतील. आपण निश्चय केला पाहिजे की आपले दान दवाखाना व शाळेतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना जाईल; तरच आज आपण या सर्वांमधूनच आपले दैवत निर्माण होऊ शकतात. आणि आजच्या कोरोना विरोधात खंबीरपणे उभे असलेले डॉक्टर्स पोलीस आणि सफाई कामगार हेच माझे दैवत.
– लेखणी शरद यशोद