चाणक्याचे धोरण असे सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट वेळ कधी ना कधीतरी येतेच. पण याच वाईट काळामध्ये आपण काही गोष्टी लक्षात घेऊन काम केले पाहिजे. आचार्य चाणक्यांना सर्वात महान विद्वानांमध्ये गनले जायचे. त्यांना लोकांच्या मनावर परिणाम करणारे प्रत्येक विषयी अचूक माहिती होती. चाणक्य अर्थशास्त्र, सैनिकीशास्त्र, पदविका आणि समाजशास्त्र तसेच राज्यशास्त्र यासारख्या महत्त्वाच्या विषयांचेही त्यांना ज्ञान होते.
सकारात्मक विचार करा :
दरम्यान, संकटाच्या काळात एखादी व्यक्ती काय करेल ती आपल्याशी कशी वागेल, या गोष्टी मनातून काढून टाकल्या पाहिजेत. आपण आपले धैर्य गमवता कामा नये.वाईट काळात आपल्या नकारात्मक विचारांना कसलेच प्राधान्य देऊ नका. जेव्हा आपल्यावर अनेक संकटे येतात तेव्हा मनोमन नेहमी सकारात्मक विचार करा.
रणनीती बनवून प्रहार करणे :
आचार्य चाणक्याचे धोरण असे सांगते की जेव्हा आपल्यावर वाईट वेळ किंवा वाईट प्रसंग येतो तेव्हा त्याला शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानंतर त्यावर ठोस रणनीती तयार केली पाहिजे. या संकटकालीन परिस्थितीला घाबरून न जाता, त्याला एक अव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे. व त्यास रणनीतीने सामोरे गेले पाहिजे.