विजयच्या चित्रपट ‘थलापति ६५’चा फस्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचं नाव ‘बीस्ट’ असे आहे. विजयच्या नवीन चित्रपटाचा फस्ट लूक पाहता चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. सोमवारी ‘सन पिक्च्स’ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ‘बीस्ट’चा फस्ट लूक शेअर केला आहे.पोस्टरमधील विजयचा लूक हा भन्नाट आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
दरम्यान, लसन दिलीप कुमार हे ‘बीस्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी स्वत: चित्रपटाची कथाही लिहिली आहे. या चित्रपटात पूजा हेगडे विजयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘मास्टर’चे चित्रीकरण संपल्यानंतर विजय लगेल ‘बीस्ट’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण हे जॉर्जियात केले. चित्रपटात पूजा हेगडे सोबतच अर्पणा दास, योगी बाबू आणि शाइन टॉम हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.