आपल्या प्रत्येकाचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-डी हे खूप महत्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन डी शरीराला भरपूर ऊर्जा देते, ज्यामुळे शरीर योग्यरित्या काम करते आहे. व्हिटॅमिन डीला सूर्यप्रकाशातील जीवनसत्व म्हणूनही ओळखले जाते. जेव्हा सूर्याची किरणे आपल्या त्वचेवर पडतात, तेव्हा शरीराला आपोआप व्हिटॅमिन डी भेटते, जर तुम्ही सूर्याच्या कमी संपर्कात असाल तर तुम्ही अनेक पदार्थांचे सेवन करून व्हिटॅमिन डी मिळवू शकता.
शरीरातील व्हिटॅमिन-डी चे फायदे :
१) मजबूत प्रतिकारशक्ती.
२) मेंदू आणि मज्जासंस्था निरोगी ठेवा.
३) हाडे आणि दात मजबूत ठेवा.
४) इन्सुलिन आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण.
५) हृदय निरोगी आणि रोगांपासून दूर ठेवा.
६) फुफ्फुसांना बळकट करा आणि कार्यक्षमता वाढवा.
७)कर्करोगाचा धोका कमी करा.
व्हिटॅमिन-डी समृध्द अन्न :
१) सॅल्मन फिश आणि फॅटी फिश.
२) अंड्यातील पिवळ बलक.
३) संत्र्याचा रस.
४) गाईचे दूध,दही आणि दुग्धजन्य पदार्थ.
५) मशरूम आणि संपूर्ण धान्य.
६) टोमॅटो,मुळा आणि कोबी.