२०१५ साली घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने शिल्पा शेट्टी, तीची आई सुनंदा शेट्टी आणि बहीण शमिता यांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलंय. 2015 मध्ये 21 लाख रुपयांचं कर्ज शेट्टी कुटुंबियांनी घेतलं होतं पण ते परतफेड करण्यात शेट्टी कुटूंबीय अयशस्वी ठरले होते.२०१५ मध्ये शेट्टी कुटुंबियाने कॉर्गिफ्ट्स कंपनीच्या नावावर २१ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. याच कंपनीत शिल्पा, तीचे वडील, आई आणि बहीण भागीदार होते. या कंपनीच्या नावावर त्यांनी कर्ज काढलं होतं. पण २०१६ मध्ये शिल्पाच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर शेट्टी कुटुंबियांनी कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला होता. त्यानंतर अमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने शेट्टी कुटुंबाला नोटीस पाठवून जुहू पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात खासगी तक्रारसुद्धा दाखल केली होती.
दरम्यान अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून या कुटुंबाला समन्स बजावण्यात आलं आहे. तसंच २८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शिल्पा शेट्टीसह बहीण शमिता आणि आई सुनंदा शेट्टी यांनादेखील न्यायालयाने समन्स बजावलं आहे.