शेतकऱ्यांची मुलगी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षाच्या माध्यमातून पीएसआय पदी नियुक्ती झाली. तेव्हा बीड जिल्ह्याच्या लेकिचा सन्मान करताना अभिमान वाटतो अशी स्तुतिसुमने उधळत कोमल नवनाथ उबाळे यांचा सत्कार शिवसंग्राम भवन येथे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या हस्ते पार पडला
दरम्यान आ. मेटे साहेबांनी लॉकडाऊनमध्ये मेसची सोय उपलब्ध करून दिली म्हणून मी पीएसआय झाले कु. कोमल उबाळे म्हणाल्या , याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मनोगत व्यक्त करताना आ. विनायकराव मेटे यांनी असे म्हटले की, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मुली कोणत्याच क्षेत्रामध्ये मुलापेक्षा पाठीमागे नाहीत परंतु पालकांची मुली बद्दलची मानसिकता बदलत आहे. क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून दाखवत आहेत ही अभिमानाची बाब आहे. माता-पित्याच्या जन्माच सार्थक केले आहे असे भावनिक उदगार आ. विनायकराव मेटे म्हणाले. वडिलांची छाती छप्पन इंच फुगून येईल असं कर्तृत्व आपल्या लेकीने केल आहे.